स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव; संजय राऊत म्हणतात...

February 25, 2021 0 Comments

मुंबईः अहमदाबादमधील मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे बुधवारी उद्घाटन झाले. या स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' असं नामकरण करण्यात आलं आहे. या नामकरणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. काँग्रेसनं केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. तर, शिवसेनेचे नेते यांनी या प्रकरणी सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे. मोटेरा स्टेडियमचा निर्णय हा तिथल्या राज्य सरकारचा आहे त्यामध्ये आम्ही काय भूमिका घेऊ शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनं मात्र याप्रकरणी संयमी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले. संजय राऊत आज मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. वाचाः 'सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांचे आदर्श आहेत आमचेही आहेत पण अलीकडच्या काळात त्यांचे जास्त आदर्श आहेत. मोटेरा स्टेडियमचा निर्णय हा त्यांच्या राज्य सरकारचा निर्णय असेल किंवा क्रिकेट बोर्डाचा असेल. त्याच्यामध्ये आम्ही काय भूमिका घेऊ शकतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत. स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव दिलं आहे ज्यांना नको असेल त्यांनी स्पष्ट पणे बोलावं,' असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः 'स्टेडियमच्या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना असलेली रिलायन्स एण्ड, अदानी एण्ड याबाबत प्रश्न विचारल्यावर राऊत यांनी, यावर राजकीय पक्ष काही भूमिका घेऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. 'गुजरातमधलं स्टेडियम आहे तिथ भाजपचं सरकार आहे. सरकारची मान्यता असेल,' किंवा क्रिकेट बोर्डाची मान्यता असेल. त्यामुळं राजकीय पक्ष यावर भूमिका घेऊ शकत नाही. 'यापूर्वीही आपापल्या राज्यात अनेकांनी अशी नावं दिली असतील त्यांना ते योग्य वाटलं असेल पण मोदी हे इतके मोठे नेते आहेत. आता तर ते मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागले आहेत,' असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: