संजय राऊतांचं काहीसं वेगळं ट्वीट; रोख नेमका कोणाकडे?
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ''तील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीच्या माध्यमातून खासदार हे पक्षाची भूमिका मांडत असतात. त्याचबरोबर फेसबुक व ट्विटरवरही ते अनेकदा पोस्ट करत असतात. सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना व्यंगचित्रे वा शेरोशायरीवर त्यांचा भर असतो. आजही त्यांनी असंच एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यांचा रोख नेमका कोणावर आहे, यावरून आता चर्चा रंगली आहे. ('s New Tweet Raises Speculation) वाचा: राऊत यांनी आज ट्विट केलेल्या चित्रात मानवी मेंदूचा भाग दाखवण्यात आला असून एक महिला मेंदू स्वच्छ करताना दिसत आहे. 'काही लोकांना खरोखरच याची गरज आहे,' असं वाक्यही या चित्रासोबत आहे. राऊत यांच्या या ट्वीटवरून आता चर्चा रंगली आहे. राज्यात व देशात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेचे एक मंत्री संजय राठोड सध्या एका आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विरोधक रोजच्या रोज त्यांच्यावर आरोप करत आहेत. चौकशीअंती पुढील निर्णय घेण्याची भूमिका राज्य सरकारनं राठोड यांच्या प्रकरणात घेतलेली आहे. मात्र, विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे. त्यांनाच तर राऊत यांनी हा टोला हाणलेला नाही ना, अशी चर्चा आहे. वाचा: कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यावर तोडगा अद्यापही दृष्टिपथात नसून उलट आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न एका बाजूनं सुरू आहेत. त्यामुळं हा तिढा अधिकच वाढत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या बाजूला, लडाखच्या सीमेवरून भारताच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैन्याने माघार घेतल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत इंचभरही घुसलेले नाही. विरोधक अफवा पसरवत आहेत, असं गेले वर्षभर सरकारकडून सांगितलं जात होतं. आता खुद्द सरकारच चिनी सैन्यानं माघार घेतल्याचं सांगत आहे. 'सामना'च्या अग्रलेखातूनही आज यावर भाष्य करत सरकारला चिमटे काढण्यात आले आहेत. चीन सैन्य माघारी गेल्याचं सांगून कुणी विजयोत्सव साजरा करत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. राऊत यांच्या ट्वीटचा रोख त्याच दिशेनं असावा, असंही बोललं जात आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: