मनसेच्या 'या' दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

February 27, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत आणि एकत्र निवडणूक लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रिपणे निवडणुका लढू शकतात, असे सूतोवाच भाजपच्या गोटातून केले जात आहेत. सध्या नाशिकमधील भाजप व मनसेच्या नेत्यांतील जवळीक अधिकच वाढली असून, शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे स्वबळावर भगवा फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला भाजप-मनसे आघाडी कडवी झुंज देणार असल्याचे चित्र आहे. (MNS-BJP May Form Alliance In ) वाचा: राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण तयार झाल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपसोबतचे संबंध वाढवले आहेत. शिवसेनेने मुंबईतील मनसेचे सात नगरसेवकही आपल्या गोटात सहभागी करून घेतल्याने नाराज मनसेने आता भाजपची साथ धरली आहे. मुंबईपाठोपाठ नाशिकमध्ये देखील मनसे आणि भाजपचे संबध अधिक घट्ट होत आहेत. नाशिकमध्ये स्थायी समितीत समसमान संख्याबळामुळे भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला मनसेने जोरदार झटका दिला आहे. महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. मनसेचा एकमेव सदस्य सलीम शेख हे भाजपच्या गोटात सहभागी झाल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत सांगलीची पुनरावृत्ती करायला निघालेल्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. महापौर, स्थायी समितीतीत भाजप आणि मनसेत झालेले मनोमिलन आता महापालिका निवडणुकीतही कायम राहील, अशी चर्चा दोन्ही पक्षांत सुरू झाली आहे. कधीकाळी नाशिक हा मनसेचा गड होता. तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता मिळाल्यानंतरही अल्पकाळात मनसेचे पतन झाले. त्यानंतर पक्षाची वाट अधिक बिकट झाल्यामुळे मनसेला देखील भाजपच्या मदतीची गरज आहे. मनसेच्या सत्ताकाळात पहिल्या टर्ममध्ये भाजप आणि मनसेची युती होती. परंतु, दुसऱ्या टर्ममध्ये ती फिस्कटली होती. पुढे महापौर आणि स्थायी समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांची जवळीक अधिकच वाढल्यामुळे आगामी महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी चर्चा नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता असून, भगवा फडकवण्याचे मनसुबे उधळे जाण्याची शक्यता आहे. दोघांना एकमेकांची गरज मोदी विरोध ते हिंदुत्वाच्या समर्थनामुळे पुन्हा भाजपशी जवळीक, असे राज ठाकरेंबाबतचे बदलणारे मतप्रवाह नाशिककरांनी देखील बघितले आहे. त्यामुळे आता राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह आगामी काळातील दहा महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मनसेचा शहरी भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा वारू रोखण्यासाठी भाजपला मनसेची गरज भासणार आहे. त्यामुळे नाशिकच नव्हे तर राज्यातही मनसे आणि भाजप अशी युती महापालिका निवडणुकीत दिसली तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे निवडणुकीआधी किंवा निवडणुकीनंतर युतीची चर्चा आता दोन्ही पक्षांत सुरू झाली आहे. वाचा: वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: