कुर्ला ते बीकेसी प्रवासासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय

February 19, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई शेअर रिक्षा चालकांची अरेरावी सहन करत कुर्ला ते बीकेसी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्वस्त आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. आणि युलू कंपनीने स्थानकात सेवा सुरू केली आहे. ३० मिनिटांसाठी २५ रुपये असा दर याचा असणार आहे. (Kulra Railway Station To BKC Travelling) कुर्ला ते बीकेसी या अंतरासाठी बेस्ट, शेअर रिक्षा असे पर्याय आहेत. शेअर रिक्षासाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागतात. प्रवासी सुरक्षा धाब्यावर बसवून अनेकदा रिक्षा चालक चार प्रवासी बसवतात. तर बेस्ट मुख्य रस्त्यावरील स्थानकांवरच थांबते. वाचा: मोबाइल अॅपच्या माध्यमाने क्यू आर कोड स्कॅन करून ई-बाइकने प्रवास सुरू करता येईल. वांद्रे कुर्ला संकुलात १९ ठिकाणी बाइक स्टँड उभारण्यात आले आहेत. त्या स्टँडवर जाऊन ही बाइक उभी करावी. एका मिनिटांसाठी दीड रुपया आणि अनलॉकसाठी ५ रुपये असे दर आहेत. सध्या नवीन असल्याने ३० मिनिटांसाठी २५ रुपये असा दर ठेवण्यात आला आहे, असे 'युलू'च्या प्रवक्त्यांनी सांगितले. ई-बाइक ही 'नॉन मोटाराइज्ड व्हेइकल' या प्रकारात येते. यामुळे याला परिवहन किंवा आरटीओची परवानगी लागत नाही. मात्र स्थानिक वाहतूक पोलिसांची एनओसी आवश्यक आहे. लवकरच मुंबई महापालिकेच्या मदतीने मुंबईतील अन्य जागीदेखील युलू बाइकचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कुर्ला स्थानकांबाहेर ११५ चौरस मीटर जागा ई सायकल/बाइक पार्किंग आणि चार्जिंगसाठी उपलब्ध केली आहे. याचा कालावधी एक वर्ष असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. यापूर्वी युलू बाइकने एमएमआरडीए सोबतदेखील ई-बाइक सेवा सुरू केलेली आहे. सीएसएमटी येथे वाहन चार्जिंग यशस्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील फलाट क्रमांक १८जवळ चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. गुरुवारी या चार्जिंग स्टेशनवर ई-कारची चार्जिंगची यशस्वी चाचणी करण्यात आली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: