'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर माजी खासदाराचा गंभीर आरोप'
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुख्यमंत्री () यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबतची माहिती लपवली. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी केली असता माहिती पूर्णसत्य नाही, त्याबाबत याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार () यांनी आयकर विभागाकडे सोमवारी केली. वाचा: मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे. त्यांनी दडवलेल्या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच आयकर विभागाचे महासंचालक भानुमती यांची भेट घेऊन ठाकरे यांच्या संपत्तीबाबत तक्रार केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. ठाकरे यांनी संपत्तीचे खरेदी मूल्य चार कोटी ३७ लाख दाखवले आहे. करारामध्ये बाजारमूल्य चार कोटी १४ लाख रुपये आहे. तर खरेदी मूल्य दोन कोटी दहा लाख रुपये दिसून येते. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अलिबाग जवळील जमिनीवरील बंगल्यांच्या संपत्तीचे बाजारमूल्य पाच कोटी २९ लाख रुपये आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: