संजय राठोड यांचा राजीनामा?; राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

February 16, 2021 0 Comments

मुंबईः आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते व राज्याचे वनमंत्री संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. भाजपनं संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, शिवसेनेतही राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही, असं म्हणत त्यांनी यावर राजीनाम्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. वाचाः 'हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसंच, संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील,' अशी माहिती राऊत यांनी दिली आहे. वाचाः दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांनी राजीनामा सोपवल्याची चर्चा आहे. त्यामुळं राठोड यांच्या राजीनामाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार असून त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेणार असल्याचं कळतंय.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: