सोलापुरात चिंता! ४३ दिव्यांग विद्यार्थ्यांसह ८ शिक्षकांना करोना

February 25, 2021 0 Comments

सूर्यकांत आसबे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा शेतकी कर्म शाळेतील ४३ विद्यार्थी आणि ८ शिक्षक कर्मचारी अशा ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (43 Diyang Students Tests Corona Positive) संस्थेचे प्रमुख अण्णाराव राजमाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. करोनाग्रस्त विद्यार्थी व शिक्षकांची नियमित तपासणी आणि औषधोपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे. २० वर्षांच्या पुढील दिव्यांग मुलांना या शाळेत शेती तसेच अन्य प्रशिक्षण दिलं जातं. १२ तारखेला या शाळेतील काही शिक्षकांना त्रास होऊ लागल्यानंतर संपूर्ण शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली .यावेळी प्रथम सहा जण करोना बाधित आढळले. यानंतर आणखी काही जणांची पुन्हा तपासणी करण्यात आली, तेव्हा ही संख्या दुपटीने वाढली. सध्या ४३ मुलं आणि ८ शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांवर करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू आहेत. यात दोन महिलांचाही समावेश आहे. एका ६५ वर्षीय जेष्ठ नागरिकास अधिक त्रास असल्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर बाकीच्या सर्व जणावर याच शाळेच्या परिसरात उपचार सुरू आहेत. शाळेत काही अनाथ मुलंही आहेत. त्यांच्यावर तिथेच उपचार करण्यात येत आहेत, तर ज्यांचे पालक आहेत आणि आजारी नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या कर्म शाळेचा परिसर मोठा आहे. अंत्रोळी आणि कंदलगावमध्ये ५० एकरावर ही जिव्हाळा शेतकी कर्मशाळा आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: