सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन
पुणे: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील बाणेरमध्ये उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. (Ex-SC Judge Passes Away) वाचा: अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी सावंत यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.१९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आली. तिथून १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखालीच पार पडली होती. ...आणि मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला! काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. २००५ साली त्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर केला. त्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या अहवालानंतर सुरेश जैन आणि नवाब मलिक यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वाचा: वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: