ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला करोना; एका आठवड्यात ४ मंत्री पॉझिटिव्ह

February 19, 2021 0 Comments

मुंबईः राज्यात करोना संसर्ग वाढत असताना लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनानं गाठलं आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. माझी करोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल तर स्वतःची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. याआधी बच्चू कडू यांना सप्टेंबर महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांनंतर त्यांनी करोनावर यशस्वी मात केली होती. वाचाः राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंत्रिमंडळातही करोनाचा शिरकाव झाला आहे. गुरुवारी सकाळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांचाही करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. खडसे यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, दोनच दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ते सध्या उपचार घेत आहेत. वाचाः एकाच आठवड्यात चार मंत्र्यांना करोनाची लागण झाल्यानं चिंता अधिक वाढली आहे. राज्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: