भाजपसोबत युती? मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणतात...

February 09, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आणि यांच्यात युती होणार की नाही, याविषयी उलटसुलट सुरू चर्चा आहे. मात्र कोणाशीही युती न करता सर्वच्या सर्व २२७ जागा स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा सूर पक्षाच्या बैठकांमधून उमटत आहे. वाचा: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच कंबर कसली असून यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या पक्षाच्या जोरदार बैठका पार पडत आहेत. या बैठकांविषयी प्रसार माध्यमांना माहिती देताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, आम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अमित ठाकरे स्वतः सगळ्या बैठकांना हजर असतात. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी खूपच आकर्षण आहे. पालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ जागांवर स्वतंत्रपणे लढावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कार्यकर्त्यांची ही भावना राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविणार असून अंतिम निर्णय तेच घेतील असेही त्यांनी सांगितले. अमित ठाकरे यांच्यावर सध्या लोकसभेच्या एका जागेची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये त्यांच्याविषयीचे आकर्षण पाहता ते एका मतदारसंघापुरते मर्यादित राहणार नाहीत. आगामी काळात अमित ठाकरे यांचा प्रभाव सर्वच महापालिकांमध्ये दिसून येईल, असा दावाही देशपांडे यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: