मुंबईत भाजप-काँग्रेसचा असा संघर्ष यापूर्वी कधीच नव्हता, आता...

February 18, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला तिढा सर्वोच्च न्यायालयाने सोडवला असला तरी पालिका निवडणुकीपर्यंत पुढील वर्षभर या ना त्या कारणाने या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटतच राहण्याची चिन्हे आहेत. पालिकेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप काँग्रेसच्या जागा खेचण्याचा प्रयत्न करणार असून, असलेल्या जागा राखून त्यात आणखी वाढ करण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. वाचा: मुंबई महापालिकेत भाजप आणि काँग्रेस असा संघर्ष यापूर्वी कधीच नव्हता. शिवसेना-भाजप युती असताना एखाद्या प्रस्तावावर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली वेगळी भूमिका मांडत असे. त्यावर सत्ताधारी म्हणून सेना, भाजपकडून उत्तर दिले जात असे. मात्र यात काँग्रेस आणि भाजपमध्ये टोकाचे वाद झाल्याचे उदाहरण नाही. २०१७च्या पालिका निवडणुकीपासून भाजप काँग्रेसला लक्ष्य करत आहे. मात्र ही बाब गेल्या वर्षभरापर्यंत काँग्रेस नेतृत्वाच्या लक्षात आली नाही, किंवा काँग्रेसने भाजपला फार महत्त्व द्यायचे नाही म्हणत भाजपच्या अतिक्रमणाचा मुद्दा झटकून टाकला होता. वाचा: भाजपने थेट विरोधी पक्षनेतेपदालाच हात घातला तेव्हा काँग्रेसला जागी झाली. या दोन्ही पक्षांतील संघर्षाला २०१७मध्ये सुरुवात झाली. राजकीयदृष्ट्या मुंबईत बलाढ्य पक्ष असल्याने त्यांच्या जागा खेचून घेणे भाजपला शक्य नव्हते. दरम्यानच्या काळात २०१४ पासून देशात मोदी लाटेचा वरचष्मा आणि काँग्रेसची घसरण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. सन २००७ मध्ये १० ते १२ आणि २०१२ मध्ये २८ नगरसेवक असलेल्या भाजपने २०१७ मध्ये थेट ८२ जागा जिंकून मोठी झेप घेतली. काँग्रेसने २००७ मध्ये ७५, २०१२ मध्ये ५२ तर, २०१७ मध्ये ३१ जागा निवडून आणल्या. २०१७ मध्ये काँग्रेस आणि मनसेच्या प्रत्येकी २० ते ३० जागा भाजपने आपल्याकडे खेचून घेतल्या. त्यामुळे सेनेच्या नगरसेवक संख्याबळाइतके नगरसेवक भाजपला निवडून आणणे शक्य झाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: