डोंबिवलीत दोन धक्के बसल्यानंतर राज ठाकरेंचा 'हा' मोठा निर्णय

February 03, 2021 0 Comments

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष () यांनी महत्वाचा निर्णय घेत लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समिती () स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक नेता आणि एक सरचिटणीस असणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून ला जोरदार झटका दिला. या घटनेला २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला धक्का दिला. या घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांसोबत बैठकीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची धुरा सोपवण्यात आली आहे.अमित ठाकरे यांच्यासोबत संदीप देशपांडे यांच्यावर उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे उत्तम काम करु शकतील असा आम्हाला विश्वास असल्याचे यांनी म्हटले आहे. प्रत्येक शाखेतील परिस्थिती राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्याचे काम आम्ही करणार आहोत. आता मुंबईपासून सुरुवात केली असून नंतर ठाणे, पुणे, नाशिक येथेही आम्ही जाणार असल्याचेही ते म्हणाले. डोंबिवलीतील घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता, त्यावर काही चर्चा झाली नसून तो विषय आमच्यासाठी संपला आहे, आता पुढे काय करायचे आहे यावर चर्चा झाल्याचे नांदगावकर म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- १) उत्तर मुंबई बाळा नांदगावकर – नेते, मनसे संजय नाईक – सरचिटणीस, मनसे २) उत्तर मध्य संजय चित्रे – नेते, मनसे राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे ३) उत्तर पश्चिम शिरीष सावंत – नेते, मनसे आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे ४) दक्षिण मध्य अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे नयन कदम – सरचिटणीस, मनसे ५) दक्षिण मुंबई नितीन सरदेसाई – नेते, मनसे मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे ६) उत्तर पूर्व अमित ठाकरे – नेते, मनसे संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: