मुलांच्या मदतीने सुनेवर बलात्कार; सासऱ्याला कोर्टाचा मोठा दणका

February 15, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवविवाहित सुनेला विशिष्ट इंजेक्शन देऊन नंतर आपल्याच दोन मुलांची मदत घेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप असलेल्या डॉक्टर सासऱ्याला अटकेपासून संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. आरोपीच्या दोन्ही मुलांचेही अटकपूर्व जामीन अर्ज न्या. सारंग कोतवाल यांनी फेटाळून लावले. वाचा: तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून ६ जून २०२० रोजी सांताक्रूझ पोलिसांनी या तिघांसह १६ जणांविरोधात एफआयआर नोंदवला. '२०१९मध्ये माझा विवाह ठरल्यानंतर माझ्या भावी पतीच्या कुटुंबीयांनी माझ्या वडिलांवर हुंड्यासाठी प्रचंड दबाव आणला. अखेर माझ्या वडिलांनी ६ जुलै २०१९ रोजी त्यांना २० लाख रुपये रोख दिले आणि त्यानंतर ८ जुलै २०१९ रोजी माझा विवाह झाला. त्यानंतर पतीने माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. परंतु, तो नंपुसक असून, त्याविषयी त्याचे वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे मला नंतर कळले. काही दिवसांनी सासरच्यांनी आणखी हुंड्याची मागणी केली आणि माझा छळ सुरू केला. २२ जानेवारी २०२० रोजी माझा पती, दीर व सासरे अचानक माझ्या खोलीत आले. पती व दीराने मला धरून ठेवले आणि सासऱ्यांनी मला जबरदस्तीने कसले तरी इंजेक्शन दिले. तसेच त्यानंतर माझ्यावर बलात्कारही केला. त्यानंतर महिन्याभराने सासरच्यांनी मला माहेरी पाठवले आणि जोपर्यंत आणखी पैसे देत नाही, तोपर्यंत मुलीला सासरी पाठवू नका, असा निरोप त्यांनी माझ्या पालकांना दिला. मार्च-२०२०मध्ये ही सर्व मानसिक यातना मी माझ्या बहिणीला सांगितली. त्यानंतर नाईलाजाने या छळाला कंटाळून जून-२०२०मध्ये मी पोलिसांत तक्रार दिली', असे फिर्यादी महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. वाचा: 'फिर्यादीने काहीशा विलंबाने एफआयआर नोंदवला म्हणून तिचे आरोप खोटे आहेत, असे आताच्या टप्प्यावर म्हणता येणार नाही. अशा प्रकरणांत एफआयआरसाठी विलंब का झाला, याचे स्पष्टीकरण पीडित महिला देऊ शकते. मात्र, ते खटल्याच्या वेळी विचारात घेतले जाऊ शकते. एफआयआरमधील आरोप अत्यंत गंभीर असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याविषयी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे या टप्प्यावर आरोपींना संरक्षण देता येणार नाही', असे न्या. कोतवाल यांनी आपल्या आदेशात नमूद केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: