भारतातील 'त्या' सेलिब्रिटींची कीव वाटते; माजी खासदारानं लगावला टोला
म. टा. प्रतिनिधी, मुंबई गेले सुमारे ७० दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ती हिच्यासह पॉप गायिका रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना यांच्यासहित अनेक लेखक, कवी, विचारवंतांचा समावेश आहे. अशावेळी परदेशातील व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घालू नये, अशी भूमिका भारतातील क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, गौतम गंभीर, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडूंनी ट्विटच्या माध्यमातून घेतल्याचे वाचले आणि त्यांची 'कीव' वाटली, अशी प्रतिक्रिया माजी खासदार यांनी दिली. या देशातील लाखो शेतकरी शेतीमालाच्या किमतीचा आपल्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी डिसेंबर-जानेवारीच्या अंग गोठवणाऱ्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर सुमारे सत्तर दिवस आंदोलन करतात. त्यामध्ये साठ-सत्तर वर्षांच्या वृद्ध महिला भाग घेतात. या आंदोलनामध्ये आतापर्यंत सुमारे ७०-८० आंदोलक मरण पावतात. सरकार त्यांची सर्व बाजूंनी नाकेबंदी करते, या गोष्टी आपल्याकडील 'तथाकथित' सेलिब्रिटींना गंभीर वाटू नये, हे त्यांच्या संवेदना गोठल्याचे निदर्शक असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांची भूमिका चुकीची वाटू शकते व सरकारच्या बाजूने उभे राहण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु सरकार व आंदोलक शेतकऱ्यांनी सध्याच्या कठीण काळात लवकरात लवकर तोडगा काढणे, हे देशाच्या हिताचे आहे. इतकीही संतुलित व समंजस भूमिका हे 'तथाकथित' सेलिब्रिटी घेऊ शकत नाहीत? असा प्रश्नही डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला. देशाचे 'खरे' सेलिब्रिटी कोण, हे आपण भारतीयांनी ठरवण्याची हे वेळ आली आहे. या देशातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले, आपापल्या निवडक क्षेत्रात यश संपादन करणारे की या सर्व क्षेत्रांमध्ये स्वत:च्या शारीरिक श्रमांवर या देशाची उभारणी करणारे श्रमिक आणि आपले शीर तळहातावर घेऊन देशाच्या सीमांच्या संरक्षण आपले सैनिक, असाही प्रश्न डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: