'महापालिका निवडणुकांत काँग्रेसला कसे सोबत घेता येईल?; शिवसेनेत चर्चा

February 20, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीने () एकत्र लढाव्यात यासाठी आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे केल्यास मोठा विजय मिळवता येऊन भारतीय जनता पक्षाला () रोखता येऊ शकेल असे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना वाटते. यावर शिवसेनेचे नेते, खासदार (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी () निश्चितच सोबत असणार आहेत. काँग्रेसला (Congress) कसे एकत्र घेता येईल, याची चर्चा होईल, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. (we will discuss about taking the party along in the upcoming municipal elections says mp ) राऊत यांनी शनिवारी शहर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांनी माहिती दिली. 'ज्यांची ताकद जास्त त्यांचे नेतृत्व' महापालिकेत जास्त ताकद असलेल्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी स्थापन करावी. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असे सूत्र ठरले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद या महापालिकेत शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर, पिंपरी-चिंचवड अशा काही महापालिकांत राष्ट्रवादीची निश्चितच ताकद जास्त आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, येत्या काळात निवडणुका एकत्र लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, तसेच इतर महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करू, असेही राऊत यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: