टॉप सेक्युरिटी घोटाळा: रणबीरच्या आतेभावाची दोन तास कसून चौकशी

February 18, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अरमान जैनची बुधवारी चौकशी केली. अरमान हा दिवंगत अभिनेते यांचा नातू, तर अभिनेता रणबीर कपूरचा आतेभाऊ आहे. ( grilled by ED) अरमानने 'लेकर हम दिवाना दिल' या चित्रपटात काम केले आहे. याखेरीज काही चित्रपटांना तो पैसादेखील पुरवत असतो. या संदर्भातच त्याचे विहंग प्रताप सरनाईक यांच्याशी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची माहिती ईडीच्या हाती आली आहे. हे चॅट पूर्णपणे आर्थिक देवाण-घेवाणीचे संबंधित आहेत. यामुळेच 'ईडी'ने त्याला चौकशीचा समन्स बजावला होता. वाचा: ईडीतील सूत्रांनुसार, अरमानला बलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. विहंग सरनाईक यांचा त्यांचे वडील आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह टॉप्स सिक्युरिटी सुरक्षारक्षक कंत्राटाशी संबंधित घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आहे. या घोटाळ्यातून मिळालेली रक्कम विहंग यांनी अरमानमार्फत चित्रपटासाठी खर्च केली. यामध्ये पैशांचा गैरव्यवहार व गैरव्यापार झाला, असा आमचा संशय आहे. यामुळेच अरमानचे नेमके आर्थिक व्यवहार काय आहेत, हे तपासण्यासाठी त्याची चौकशी करण्यात आली. वाचा: एमएमआरडीएने टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अॅण्ड सोल्यूशन्सला पुलांसाठी ३५० सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट दिले होते. पण, एमएमआरडीएने फक्त ७० टक्के सुरक्षा रक्षकच पुरवले. त्याद्वारे १७५ कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप आहे. तसेच, या घोटाळ्यापोटी आमदार प्रताप सरनाईक यांना सात कोटींची लाचदेखील मिळाली, असा ईडीचा संशय आहे. याचप्रकरणी ईडी हा तपास करीत आहे. वाचा: टॉप्स ग्रुपने १४० सुरक्षारक्षक एमएमआरडीएला पुरवले. त्यापोटी त्यांनी दरमहा १३ लाख रुपयांचे बिल एमएमआरडीएला देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कंपनीने २७० सुरक्षा रक्षकांपोटी दरमहा ४३ लाख रुपयांचे बिल एमएमआरडीएला दिले असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: