ड्रग्ज प्रकरणात चक्क मर्सिडीज गाडी ठरली आरोपी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई अमली पदार्थविरोधी कारवाईत चक्क एक गाडी आरोपी ठरली आहे. या गाडीचा उपयोग करून श्रीमंत ग्राहकांना अमली पदार्थ पुरवणाऱ्या दलालास नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने () जोगेश्वरी येथून अटक केली आहे. वाचा: अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आरिफ भुजवाला व चिंकू पठाण या दोघांना अटक केल्यानंतर एनसीबीने अमली पदार्थ दलालांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये फरार असलेल्या मोहम्मद बिलालचा एनसीबीसह अन्य तपास संस्थांकडून कसून शोध सुरू आहे. ती मोहीम सुरू असतानाच एनसीबीने 'अंडरवर्ल्ड'शी संबंधित लहान-मोठ्या दलालांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत दोन दिवसांपूर्वी कुर्ल्यात कारवाई केल्यानंतर आता जोगेश्वरीमध्ये महत्त्वाची कारवाई करण्यात आली. याबाबत एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, ' ऊर्फ इब्राहिम कासकर हा कुख्यात आहे. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. तो जोगेश्वरीत १०० ग्रॅम मेफेड्रोन या अमली पदार्थांसह सापडला. मर्सिडीज कंपनीच्या गाडीने तो 'हाय प्रोफाईल' ग्राहकांना अमली पदार्थ पुरवत असल्याचे समोर आले. यामुळेच मर्सिडिज गाडीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' पोलिसांवर हल्ला प्रकरणीही गुन्हा इब्राहिमच्या चौकशीत एनसीबीच्या पथकाला डोंगरी भागातील आसिफ राजकोटवाला याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तात्काळ डोंगरी भागात मोर्चा वळवत राजकोटवाला यालाही अमली पदार्थांसह अटक केली. इब्राहिम व आसिफ हे एकत्र काम करतात. मुख्य म्हणजे इब्राहिमविरुद्ध याआधीही पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी भादंविच्या ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल असून तो सध्या जामिनावर आहे. पण त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: