पुणे: जेलमधून सुटताच कुख्यात गँगस्टर गजानन मारणेवर गुन्हा दाखल

February 16, 2021 0 Comments

पुणे: खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड याच्याविरोधात पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मारणे आणि त्याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाकापर्यंत शेकडो वाहनांचा ताफा आणि फटाके वाजवून मिरवणूक काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे हा पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात तुरुंगात होता. सोमवारी (ता. १५) रोजी त्याची निर्दोष मुक्तता झाली. नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून त्याला सोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा कारागृहाबाहेर त्याच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तसेच तेथून शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाका येथे मिरवणूक काढली. बेकायदेशीर जमाव जमवून फटाके फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरणही केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवेवर शेकडो वाहनांचा ताफा, आरडाओरडा, दहशत गुंड गजानन मारणे हा निर्दोष सुटून तुरुंगातून बाहेर आला. त्याच्या स्वागतासाठी तळोजा कारागृहाबाहेर साथीदारांनी गर्दी केली होती. त्यानंतर मुंबई-पुणे हायवेवर उर्से टोलनाका येथे शेकडो वाहनांचा ताफा, आरडाओरडा आणि डीजेसह फटाके फोडून मिरवणूक काढली. परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: