सांगली जिंकण्यासाठी जयंत पाटील यांनी नेमकं काय केलं?

February 24, 2021 0 Comments

‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले. भाजपच्या ताब्यातील सांगली महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांची महत्त्वाची भूमिका असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजकारणाला त्यांनी धक्का दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. वाचा: जयंत पाटील यांनी सांगली-मिरज महापौर निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीत काँग्रेसच्या सर्व गटांना एकत्र आणले होते. काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, मदन पाटील यांचा गट आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना एकत्र आणून जयंत पाटील यांनी त्या महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर, तर काँगेसचा उपमहापौर केला आहे. सांगली मिरज महापालिकेत एकूण ७८ जागा असून, यामध्ये भाजप ४१, अपक्ष २, काँग्रेस २० आणि १५ असे संख्याबळ होते. राष्ट्रवादीचे महापौर पदाचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. वाचा: महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जयंत पाटील व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती. तर, सत्ता राखायचीच यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. यानंतर झालेल्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. वाचा: सांगली-मिरज महापालिकेत बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली. अखेर ती व्यर्थ ठरली असल्याचे निकालानंतर समोर आले आहे. दरम्यान, विधान परिषदेची पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते. त्यावर सांगलीतील महापौर विजयाने शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी मुंबईत दिली आहे. 'भाजपला धोबीपछाड देऊ' सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका; तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असाच धोबीपछाड देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: