नगर: महापालिकेचा लाचखोर आरोग्य अधिकारी 'असा' अडकला सापळ्यात

February 17, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: महापालिकेचा आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नरसिंह सार्वेत्तमराव पैठणकर (वय ४२) याला अडीच लाख रुपयांची स्वीकारताना आज, बुधवारी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक पथकाने सावेडीतील कचरा डेपोतील कार्यालयात सकाळी ही कारवाई केली. महापालिकेचा मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे. तक्रारदार ठेकेदाराने हे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पैठणकर याने पाच लाख रुपये मागितले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी काही प्रशासकीय पातळीवर त्रुटींचा अडथळा होता, तो दूर करण्यासाठी पैठणकर याने हे पैसे मागितले होते. त्यातील अडीच लाख रुपये स्वीकारताना पैठणकर याला नाशिकच्या पथकाने ताब्यात घेतले. नाशिकचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. नरसिंह पैठणकर याच्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कारभार होता. या विभागाच्या कारभारात हलगर्जीपणाचा केल्याचा पैठणकर याच्यावर ठपका होता. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पैठणकर याला जून २०१९ मध्ये निलंबित केले होते. शहरातील घनकचरा संकलन, हरित लवाद्याकडील सुनावणीला गैरहजर राहणे, स्वच्छ अभियानात घसरलेले मानांकन, शौचालयांची प्रलंबित कामे, प्लास्टिक वापरावर न होणारी कारवाई, प्लॉस्टिक विल्हेवाटसाठी आराखडा सादर न करणे, यावर प्रदूषण मंडळाकडून आयुक्तांना आलेली नोटीस, सावेडी कचरा डेपोला लागलेली आग अशा कारणांमुळे पैठणकर याच्यावर त्यावेळी निलंबनाची कारवाई झाली होती.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: