धारावीमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय; 'हे' आहे कारण...

February 23, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गाचा फैलाव धारावीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली होती. प्रशासकीय, वैद्यकीय आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हरप्रकारे करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे यंत्रणेला संसर्ग नियंत्रणात ठेवण्यास यशही मिळाले होते. आता धारावीमधील संसर्ग पुन्हा वाढतो आहे. हा संसर्ग झोपडपट्ट्यांमधील भागातला नसला तरीही एकत्रित धारावीमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. सर्दी, खोकला, ताप अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत असतात. करोनाची भीती संपल्यासारखे सार्वजनिक वर्तन करतात. त्यामुळे हा संसर्ग वाढत असल्याचे वैद्यकीय निरीक्षण येथे रुग्णसेवा देत असलेल्या डॉक्टरांनी नोंदवले आहे. वाचा: धारावीमध्ये आजवर ४,०२४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील उपचाराधीन रुग्णसंख्या २८ नोंदवण्यात आली आहे. रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ३६८० इतकी आहे. माहीमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून ती १३१ इतकी आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ४९३२ इतके आहे. तर, दादरमध्ये करोनारुग्णांची संख्या आत्तापर्यंत ५०४५ रुग्णांची नोंद झाली असून त्यात उपचाराधीन रुग्णसंख्या ९८ इतकी आहे. धारावीमध्ये रविवारी ही रुग्णसंख्या ४०१९ इतकी होती. त्यावेळी दादरमध्ये रुग्णसंख्या ५०३५, तर माहीममध्ये ही संख्या ४९२२ इतकी नोंदवण्यात आली होती. २० फेब्रुवारी रोजी एकत्रित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या धारावीमध्ये ४०१२ इतकी होती, तर दादरमध्ये हे प्रमाण ५०२९ इतके नोंदवण्यात आले. उपचाराधीन रुग्णांमध्ये धारावीमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. वाचा: पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, धारावीमध्ये रुग्णसंख्येत थोडी वाढ असली तरीही ती झोपडपट्टी वा दाटीवाटीच्या भागामध्ये नाही. येथील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे संख्या नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचे कारण नाही. किरण दिघावकर यांनीही रुग्णसंख्या नियंत्रणात असून ती दाटीवाटीच्या परिसरात वाढत नसल्याचे सांगितले. बेजबाबदार वर्तनामुळे संसर्गवाढ वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अनिल पाचणेकर यांनी लोकांच्या बेशिस्त वर्तनामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. नवे रुग्ण आढळत असून सर्वसामान्यांकडून नियमांचे पालन होत नाही, याकडेही लक्ष वेधले. मास्क न लावणे, गर्दी करणे, सुरक्षित अंतर न पाळणे अशा बेजबाबदार वर्तनामुळे संसर्ग वाढू लागला आहे. ज्यांना करोनाचे निदान होते त्यांच्यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे करोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: