लसीकरणातही राजकारण! ठाण्यात महापौर, आमदारांनी नियम मोडल्याचा आरोप

February 26, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, महापौर आणि आमदार यांनी घेतलेल्या करोना लसीवरून ठाण्यात राजकारण सुरू झाले आहे. महापौरांनी नियम डावलून स्वत: करोना लस घेतली. तसेच महापौरांसह आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली करोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे, असा आरोप महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, हा संदेश सर्वांना देण्यासाठी लस घेतली असल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखविणार का, असा सवालही डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार करोनाशी युद्ध करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना करोनाची लस दिली जात आहे. त्यात फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, नगरसेवक वा कोणताही लोकप्रतिनिधी हा फ्रंटलाइन वर्कर्समध्ये समावेश असलेला नाही. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश केलेला आहे, असे मनोहर डुंबरे यांचे म्हणणे आहे. करोना लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य आणि पोलिसांबरोबरच लोकप्रतिनिधींचाही समावेश करावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. मात्र, आपल्या पदाचा गैरवापर करीत नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांनी स्वत:ला लस टोचून घेतली, असा आरोप डुंबरे यांनी केला आहे. वाचा: महापौर कार्यालयातून माझ्याकडे कोविड लस घेण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्डची प्रत मागण्यात आली. भविष्यातील लसीकरणासाठी यादी तयार केली जात असल्याचे मला वाटले होते. त्यानंतर लगेच मला लस घेण्याची सूचना करण्यात आली. या संदर्भात सरकारी यंत्रणांकडे चौकशी केल्यावर केवळ फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आपण लस घेतली नाही, असेही डुंबरे यांनी स्पष्ट केले. 'मनोहर डुंबरे यांची दुटप्पी भूमिका' 'महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. लोकांमध्ये काम करतात. म्हणून आम्ही नगरसेवकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी काही नगरसेवकांनी लस घेतली आहे. मी तर नंतर लस घेतली. कोव्हिन अॅपवर नोंदणी करून लस दिली जात आहे. मनोहर डुंबरे यांनी स्वत: माझ्या कार्यालयात येऊन लस घेण्यासाठी पेपर जमा केले आहेत. जर हे नियमाविरुद्ध आहे तर डुंबरे यांनी पेपर का जमा केले. डुंबरे यांची ही दुटप्पी भूमिका आहे. लसीकरणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहेत. महापौर लस घेत आहेत तर ही लस सुरक्षित आहे,' असा हा संदेश मला ठाणेकरांना द्यायचा होता, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: