वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंना जामीन मंजूर

February 06, 2021 0 Comments

नवी मुंबई: वाशी टोलनाक्यावरील तोडफोड प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना आज वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. ( in ) वाचा: २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. २६ जानेवारी २०१४ रोजी राज यांनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह अन्य सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना २०१८ व २०२० मध्ये समन्स आणि वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मागील महिन्यान न्यायालयानं ते वॉरंट रद्द केलं होत. मात्र, ते करताना ६ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. वाचा: न्यायालयाच्या आदेशानुसार राज ठाकरे आज हजर झाले. तिथं प्रकरणाची सुनावणी होऊन त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा न्यायालयानं राज यांना दिल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: