वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?; भाजप नेत्याचं ट्वीट चर्चेत
मुंबईः सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येवरुन राजकारणात खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तसंच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट यांचं नाव घेत कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार अशी चर्चा असतानाच वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. पूजा चव्हाण ही तरुणी टिक टॉकमुळे प्रकाशझोतात आली होती. सोशल मीडियात तिचा मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती परळी वैजनाथ येथून पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात ती वास्तव्याला होती. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि एक मित्रही होता. ८ फेब्रुवारी रोजी पूजाने इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. मात्र, गेले काही दिवस याअनुषंगाने १० ते १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यातून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या क्लिपमध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं संभाषण असून तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळं भाजपनं हा मुद्दा उचलून धरत राठोड यांच्या राजीनामाच्या मागणी केली होती. त्यातच संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा सोपवल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, अद्याप संजय राठोड किंवा शिवसेनेनं यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाहीये. वाचाः संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा असतानाच भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केलेलं एक ट्वीट सध्या लक्ष्य वेधून घेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मतोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा, अशी मागणी दरेकरांनी केली आहे. तसंच, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं, असं होता कामा नये. राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, असंही ते म्हणाले आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: