भयंकर प्रकार! पोलिओऐवजी दिला सॅनिटायझरचा डोस

February 02, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा, पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान बारा बालकांना सॅनिटायझरचा डोस पाजण्यात आल्याची धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी येथे घडली. या बालकांवर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( instead of polio dose) भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रविवारी कापसी कोपरी गावात पोलिओ लसीकरण राबविण्यात आले. यादरम्यान गिरीश गेडाम, योगीश्री गेडाम, अंश मेश्राम, हर्ष मेश्राम, भावना आरके, वेदांत मेश्राम, राधिका मेश्राम, प्राची मेश्राम, माही मेश्राम, तनुज मेश्राम, निशा मेश्राम, आस्था मेश्राम या बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आले. काही तासांतच या मुलांना उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आई-वडील घाबरले. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांना तत्काळ यवतमाळच्या वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी रुग्णालयात जाऊन मुलांची पाहणी केली. नंतर बालकांना तातडीने पोलिओ लस देण्यात आली. सीईओंकडून चौकशी सुरू गावात लसीकरणादरम्यान हजर असलेल्या आशा, अंगणवाडी सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना ही चूक लक्षात आल्यानंतरही त्यांनी चूक दडवून ठेवली. बालकांना पोटदुखी आणि उलट्याचा त्रास सुरू झाल्यावर ही बाब समोर आली. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून चौकशी सुरू आहे. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: