कार्यक्रमाला परवानगी नाकारली; मनसेचं सरकारला थेट आव्हान

February 26, 2021 0 Comments

मुंबईः मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असून नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, असा इशाराच मनसे नेते यांनी दिला आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं 'मराठी स्वाक्षरी' या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. मनसेचे अध्यक्ष यांनीही एका पत्रातून आवाहन केलं होतं. शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या सरकारला 'अमराठी' का म्हणू नये?, असा सवाल केला आहे. 'करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे, त्या नियमांचे काटेकोर पालन करुन मनसेनं कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला,' असं अमेय खोपकर यांनी सांगितलं आहे. वाचाः 'ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत असे संजय राठोडसारखे मंत्र्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येनं एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो?, महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच अमराठी आहे की काय?,' असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. वाचाः तसंच, 'आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजेच करणारच,' असंही अमेय खोपकर यांनी ठणकावलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: