अजित पवारांची संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; नेमकं काय झालं?
मुंबईः आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे नेते व वनमंत्री हे संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनतर ते गायब असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला तसंच त्यांच्यांसोबत फोनवर बोलणं झालं असल्याचं ते म्हणाले आहेत. संजय राठोड हे गायब असल्याची चर्चा असतानाच अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. संजय राठोड गायब नसून आजच मी त्यांना फोन करुन यवतमाळच्या करोना परिस्थितीबाबत चर्चा केली, असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला आहे. वाचाः यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळं या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार आहे. आजच माझं लॉकडाऊनसंदर्भात संजय राठोड यांच्याशी फोनवरुन बोलणं झालंय. तिथली परिस्थीत गंभीर बनत चाललीये तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असं त्यांच्या कानावर घातलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत. राज्यात करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनसंदर्भात या तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी अजित पवारांनी आज फोनवरुन चर्चा केली आहे. वाचाः अनिल राठोड पोलिसांच्या ताब्यात? यावेळी अजित पवारांना पूजाच्या आत्महत्येप्रकरणी अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांसोबत संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला तर त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: