Anand Unawane : पिंपरीतील उद्योजक आनंद उनावणेंच्या अपहरण-हत्येचा छडा; वर्षभर 'त्याने' रचला होता कट

February 24, 2021 0 Comments

पुणे: पोलिसांनी मंगळवारी उद्योजक यांच्या अपहरण आणि हत्येचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वर्षभरातून मुख्य आरोपी उनावणेंच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचत होता, असे स्पष्ट झाले आहे. 'रिकव्हरी एजंटने अपहरण आणि हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षभरापूर्वी उनावणे यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्याचवेळी त्याने उनावणेंच्या हत्येचा कट रचला होता. तो अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. त्या या गुन्ह्यात सामील होते. तर इतर तिघा जणांना सोन्याचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी अटक केली आहे. उनावणे यांच्याकडून संशयितांनी ते खंडणी स्वरुपात उकळले होते. तेच दागिने या तिघांनी खरेदी केले होते,' अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. आम्ही रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी एकूण ६४ लाखांचा ऐवज लुटला होता, अशीही माहिती त्यांनी दिली. उनावणे यांचे ३ फेब्रुवारीला पिंपरीतील मोरवाडी येथील ते राहत असलेल्या निवासी इमारतीच्या पार्किंगमधून अपहरण करण्यात आले होते. ६ फेब्रुवारीला महाडजवळ सावित्री नदीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. उनावणे यांच्या बंधूंनी ५ फेब्रुवारीला पिंपरी पोलिसांत आनंद उनावणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. रायगड पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून, हे प्रकरण पिंपरी पोलिसांकडे वर्ग केले होते. पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या चौघांची ओळख पटलेली आहे. उमेश मोरे (वय २८), तुळशीराम पोकळे (वय ३०, दोघेही राहणार काळेवाडी), दीपक चांडालिया आणि सागर पतंगे अशी चौघांची नावे आहेत. तर राकेश हेमनानी, कपिल हसवानी आणि प्रवीण सोनावणे अशी इतर तिघांची नावे आहेत. 'वर्षभरापूर्वी उनावणे यांच्या कंपनीत काम करणाऱ्या रिकव्हरी एजंटला त्यांनी वर्षभरापूर्वी कामावरून काढले होते. उनावणे यांचे अपहरण केल्यानंतर संशयितांनी पैशांची मागणी केली नव्हती. पण त्यांनी मॅनेजरला फोन करण्यास सांगितले होते. ४० लाख रुपये काढून ते कारमध्ये ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर एका मैत्रिणीच्या फ्लॅटवर जाऊन पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी उनावणे यांचा फोन हा कर्नाटकाकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे,' अशी माहितीही पोलिसांनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: