Ram Shinde: भाजपचा 'हा' माजी मंत्री म्हणतो, मी विकासाचा दहशतवादी!

January 20, 2021 0 Comments

नगर: ‘आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा 'सामाजिक गुंड' कोणी नाही,’ असा इशारा कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी माजी मंत्री यांना दिला होता. त्याला प्रा. शिंदे यांनी आज उत्तर दिले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत आपण या मतदारसंघात विकासाची दहशत निर्माण केली आहे. त्याची राज्यभर चर्चा आहे. जे कोणी स्वत:ला सामाजिक गुंड म्हणवून घेत असतील त्यांनी त्याचे विश्लेषण करावे. मात्र दबाव आणि दडपशाहीचे राजकारण फार काळ टिकत नाही, असा टोलाच शिंदे यांनी लगावला आहे. ( ) वाचा: तालुक्यातील निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी नेते राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषद बोलाविली होती. आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याचा दावा केला होता. तो खोडून काढताना शिंदे म्हणाले, ‘हा दावा पूर्णपणे खोटा आहे. या तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील २३ ग्रामपंचायती निर्विवादपणे भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. ४ बिनविरोध झाल्या असून १० ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही'. वाचा: जामखेड तालुक्यात भाजपच्याच ग्रामपंचायती जास्त आहेत. सर्वांत मोठ्या खर्डा ग्रामपंचायतीत कोणालाच बहुमत मिळालेले नाही, असे नमूद करताना मुळात आमदाराने गावपातळीवरील राजकारणात फार लक्ष घालायचे नसते. हा संकेत आपण आतापर्यंत पाळत आलो. मात्र, पवार यांनी इतिहासात प्रथमच थेट गावपातळीवर जाऊन प्रचार केला आहे. आपण कधीच गटातटाचे राजकारण केले नाही. माझ्यावर असा आरोप करणारेच सर्व संकेत बाजूला सारत गावात जाऊन दबावाचे राजकारण करीत होते. आता हा नवीन पॅटर्न ग्रामपंचायत निवडणुकीत आणला गेला आहे. दहशत कोण करत आहे, हे लोकांना चांगले माहिती आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या काळात आम्ही मतदारसंघात विकासाची दहशत निर्माण केली. आता जे परिवर्तन झाल्याचे सांगत आहेत, त्यांनी दबावाचे आणि दहशतीचे राजकारण आणले आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की, असे राजकारण फार काळ टिकत नसते. स्वत:ला सामाजिक गुंड म्हणवून घेणाऱ्यांनी त्याचे विश्लेषण करावे. आता लवकरच नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याची आम्ही वाट पहात असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक आपण स्वत: लढविणार नाही. यामध्ये भाजपचा स्वतंत्र पॅनल असेल. तो ठरविण्यासाठीच्या समितीवर माझी निवड झालेली आहे. त्यामुळे तालुका मतदारसंघातून ही निवडणूक लढविण्याचा प्रश्नच नाही,’ असेही शिंदे म्हणाले. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: