Radhakrishna Vikhe-Patil: विखे-पाटलांचं २० वर्षांचं वर्चस्व मोडीत; लोणी खुर्द ग्रामपंचायत हातातून गेली

January 18, 2021 0 Comments

अहमदनगर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून अनेक धक्कादायक निकाल पुढं येत आहेत. नगरमध्ये भाजपचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. गावात विखेंच्या पॅनलचा दणदणीत पराभव झाला आहे. () वाचा: लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी १७ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. विखे यांच्या पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. मात्र, शेजारच्या लोणी खुर्द गावातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या गावात मागील २० वर्षांपासून विखेंची सत्ता होती. यावेळी विखेंना सत्ता गमवावी लागली आहे. जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलनं विखेंना धक्का दिला आहे. राहता तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात मात्र विखेंना आधीच यश आलं आहे. राम शिंदे यांनाही धक्का नगरमधील भाजपचे दुसरे नेते व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना पराभवाची धूळ चारणारे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या चौंडी गावची सत्ता भाजपकडून खेचून आणली आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: