EXPLAINER:शहरांच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध का? जाणून घ्या हे महत्त्वाचे मुद्दे

January 04, 2021 0 Comments

मुंबईः महाराष्ट्राचं राजकारणात सध्या शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन तापलं आहे. ठकारे सरकारमधील तीन पक्षांनी विरोधी भूमिका मांडल्यानं आघाडीत बिघाडी होणार का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत. एकीकडे शिवसेना औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार या मुद्द्यावर अडून बसली आहे. तर, काँग्रेसनं मात्र नामांतराला ठाम विरोध केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका मुलाखतीत नामांतराला काँग्रेसचा विरोध का? याबाबत काही मुद्दे मांडले आहेत. शहरांचे नाव बदलून त्यांचा विकास करता येत नाही. नागरिकांच्या आणि शहरातील समस्या सोडवण्यास प्रथम प्राधान्य देण, हा काँग्रेसच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा पहिला मुद्दा आहे. म्हणूनच काँग्रेस नांमातराला काँग्रेसचा विरोध आहे. तसंच, निवडणुकांच्या दरम्यानच अशा मुद्द्यांचा वापर केला जातो. या मुद्द्यांचा नागरिकांच्या समस्येशी कोणताही संबंध नाही. असंही काँग्रेसचं म्हणण आहे. त्याचबरोबर, मुळ मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्यासाठी अशा मुद्द्यांवरुन प्रचार केला जातो, असंही काँग्रेस म्हणते. सचिन सावंत यांनी पुढे म्हटलं आहे की, औरंगाबाद शहरात आजही मुलभूत सुविधांचा आभाव आहे. रस्त्यांवर खड्डे, पिणाच्या पाण्याची समस्या, शहरातील उद्योगक्षेत्र. या सारख्या समस्यांवर पहिले लक्ष दिले गेलं पाहिजे, असं मतही त्यांनी मांडलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारनं औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव देऊन ८ महिने उलटुन गेले आहेत त्याला अद्याप परवानगी मिळाली नाहीये. यावरुनचं काँग्रेसनं भाजपवरही टीका केली आहे. या मुद्द्यांवरुन भाजपला नेमकं कोणतं राजकारण करायचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. शहरांची नावं बदलण्याच्या अजेंडावर काँग्रेसचा विश्वास नाहीये. त्याव्यतिरिक्त शहरातील समस्या सोडवण्यास काँग्रेसचं प्राधान्य असेल, असं सावंत म्हणाले आहेत. शहारांची नावं बदलल्यामुळं नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. एका समुदायाला खूष करण्यासाठी दुसऱ्या समुदायाला नाराज करणं हे बरोबर नाही, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: