Chhota Rajan : कुख्यात गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणात २ वर्षांची शिक्षा

January 04, 2021 0 Comments

मुंबई: मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टानं कुख्यात गुंड याला प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी कोर्टानं दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राजनसह सुमित म्हात्रे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या आणि सुरेश शिंदे यांनाही शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण २०१५ सालचं आहे. नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जमीन खरेदी केली होती. त्या मोबदल्यात एजंट परमानंद ठक्करला २ कोटी रुपये कमिशन देण्याचे ठरले होते. ठक्कर याला आणखी पैसे हवे होते. मात्र, वाजेकर यांनी ते देण्यास नकार दिला होता. ठक्कर याने त्यानंतर छोटा राजन याच्याशी संपर्क साधला. ठक्कर सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे. छोटा राजनने आपली काही माणसं कार्यालयात पाठवली. तसेच धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी वाजेकरकडे २ कोटींऐवजी २६ कोटी रुपयांची मागणी केली. तसेच वाजेकरला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बांधकाम व्यावसायिकाला छोटा राजननेही दोन वेळा फोन केला होता. मुंबईतील हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला शिक्षा झाली आहे. याशिवाय, दिल्लीत बोगस पासपोर्ट प्रकरणातही राजनला शिक्षा सुनावण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: