अमित ठाकरेंनी वर्षभरात काय केलं? मनसेनं प्रसिद्ध केलं रिपोर्ट कार्ड
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री म्हणून नव्या गोष्टी, उपक्रम हाती घेत असताना आता अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र यांचेही गेल्या वर्षभरातील कामांचे रिपोर्टकार्ड मनसेने तयार केले आहे. अमित यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत असल्याचे निमित्त साधत व्हिडीओ ट्रेलरच्या माध्यमातून हे रिपोर्टकार्ड काढण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर पर्यावरण विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी उपक्रम हाती घेतले. या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी मनसेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अमित यांनीही पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले असून त्यावर प्रकाश टाकण्यासाठी पक्षानेच पुढाकार घेतला आहे. वाचा: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमित यांनी आरे कॉलनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यातील बंधपत्रित डॉक्टर्स नर्सेस यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी लावून धरली. करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या-आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी अमित यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले, याकडे लक्ष वेधण्यात आले. वाचा: राज्यातील आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला वाढायला हवा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांनी ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली. एमपीएससी-युपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी, विशेषत पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी एसटी उपलब्ध करून देण्याची विनंती अमित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या सगळ्या कामांचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: