संगमनेरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा आत्महदनाचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

January 26, 2021 0 Comments

म.टा. प्रतिनिधी, नगर न्यायालयात सुरू असलेला जागेचा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवावा या मागणीसाठी तालुक्यातील खांडगांव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने केला. संगमनेर तहसील कार्यालयाच्या आवारातच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकाचा जीव वाचला असला तरी साठ टक्के भाजल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्यावर्षीही याच नागरिकाने असा इशारा दिला होता, मात्र पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने दुर्घटना टळली होती. अनिल शिवाजी कदम (वय ७० रा. खांडगाव, ता. संगमनेर) यांनी काही वर्षांपूर्वी गणेशवाडीतील सादीक रज्जाक शेख व सुमय्या सादीक यांच्याशी एका जागेचा व्यवहार केला होता. त्यापोटी दोघांमध्ये साठेखतही झाले होते. मात्र व्यवहार पूर्ण होत नसल्याने त्या दोघांमध्ये वाद होते. हा वाद अखेर न्यायालयात गेला. सध्या तो न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशी कदम यांची मागणी होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून आपल्या जागेत राहणाऱ्या घरातील शेख कुटुंबियांना बाहेर काढावे, अशी कदम पोलिसांकडे करीत होते. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आणि न्यायप्रविष्ट असल्याने पोलिस काही करू शकत नव्हते. अनेकदा त्यांनी कदम यांना समजावूनही सांगितले होते. तीन दिवसांपूर्वी कदम यांनी याच मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. प्रजासत्ताकदिनी सरकारी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी परतत असतानाच आधीच तहसील कार्यालयाच्या आवारात आलेल्या अनिल कदम यांनी अचानक अंगावर रॅकेल ओथून घेतले आणि आग लावून घेतली. हा प्रकार लक्षात येताच सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी धाव घेत पेटलेल्या कदम यांच्यावर पाणी टाकले. त्यांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले. आगीत ते सुमारे साठ टक्के भाजले आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुख्य म्हणजे कदम यांनी गेल्यावर्षीही असाच प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आधीच दखल घेऊन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे गेल्या प्रजासत्ताकदिनी त्यांना असे आंदोलन करता आले नव्हते. यावेळी मात्र कदम इशाऱ्याचे निवेदन दिल्यानंतर गायब झाले होते. त्यांचा कसून शोध घेवूनही ते आढळून आले नाहीत. त्यानंतर सकाळी अचानक हा प्रकार घडला. कदम यांना मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग व दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: