'कृषी कायदे येण्याआधीच अदानींना गोदामवाटप'

January 26, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ' येण्याआधीच अदानी समुहाला शेतमाल साठवणुकीची कवडीमोल किमतीने वाटप करण्यात आली. सोनीपत, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी ही गोदामे आहेत', असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांनी शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने निवडक पत्रकारांशी बोलताना केला. ( attacks Modi Government for favouring Adani Group) आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा चौकातील मोर्चा संपल्यानंतर मेधा पाटकर यांच्याशी काही पत्रकारांनी संवाद साधला. करोना काळात केंद्र सरकारने मोठ्या उद्योगपतींची ६८ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. 'शेतकऱ्यांची मागणी जेमतेम अडीच-तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आहे. पण ती माफ न करता आता कृषी कायद्यांद्वारे मोठ्या उद्योजकांसाठी कायदे आणले गेले आहेत. या कायद्यांद्वारे उद्योजक शेतकऱ्यांचा माल हवा त्या प्रमाणात त्यांच्या गोदामात साठवून ठेवतील, मग त्यातून शेतकऱ्यांची व पर्यायाने जनतेचीही पिळवणूक होईल. यामुळे केंद्र सरकारने कायदे केवळ स्थगित करू नये. आता कायदे स्थगित करतील व निवडणुकीनंतर ते पुन्हा लागू होतील, हे आम्हाला नको हवे. कायदे पूर्णत: मागे घेणे हीच मागणी आहे', असे पाटकर म्हणाल्या. वाचा: शेतकरी मोर्चाला राज्यपालांनी भेट नाकारली. त्याबाबत मेधा पाटकर म्हणाल्या, 'वास्तवात एखाद्या कायद्यामुळे दलित व आदिवासींचे नुकसान होत असल्यास ते कायदे त्या क्षेत्रात लागू करता येणार नाही, असा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. त्यामुळे त्यांनी भेट द्यायला हवी होती.' दरम्यान, या मोर्चात राज्यभरातील १५ हजारहून अधिक शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले असले, तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्याही असल्याचे त्यांच्याशी केलेल्या संवादातून दिसले. वन हक्क कायदा, वन जमिनींचे शेत जमिनीत रूपांतर करणे, कसलेल्या जमिनीची मालकी हवी असणे, बियाणे मिळत नसल्याची तक्रार, बोगस बियाण्यांमुळे होणारे नुकसान, गावात पुरेशे पाणी मिळत नसणे अशा तक्रारींचे गाऱ्हाणेही त्यांनी यावेळी मांडले. ढोल वाजविणारे आबाजी या मोर्चातील आबाजी शिरस्ते हे शेतकरी पुणे जिल्ह्यातून आले होते. ते वास्तवात शेतमजूर आहेत. पण, त्यांना ढोल वाजविण्याची आवड आहे. त्यांच्या गावात ते एकटेच ढोलवादक आहेत. कोणाच्या घरी लग्न असो वा कोणाची अंत्ययात्रा, त्यामध्ये ते ढोल वाजवतात. त्यांच्या गावात अंत्ययात्रेतही वाद्य वाजविण्याची प्रथा आहे. शेतकरी मोर्चात ते घोषणांच्या तालावर ढोल वाजवत होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: