शिर्डी: पुन्हा नवीन वादाची चिन्हे, एका भक्ताचे थेट द्वारकामाईत दर्शन, कायदा फक्त ग्रामस्थांसाठीच का?
शिर्डी: साईबाबा संस्थान शिर्डीचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व शिर्डी ग्रामस्थ यांच्यातील वाद गेल्या 31 डिसेंबर पासून सुआहे. गावकऱ्यांना दर्शनासाठी अडवणूक व वेगवेगळे कठोर नियम हा ह्या वादाचा मुख्य मुदा असून गेल्या काही दिवसांपासून ह्या वादाशी संबंधित शिर्डी ग्रामस्थ व साई संस्थान चे अधिकारी यांच्यात अनेक बैठका होत आहेत.ह्या बैठकांमध्ये खूप वेळा 'गरमा गरमी' सुद्धा पहायवास मिळाली, परंतु कान्हूराज बगाटे यांनी शेवटी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू करू असे आश्वासन दिले आणि हे आस्वासन अजून प्रत्यक्षात उतरण्याआधीच नवीन वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चक्क द्वारकामाईत दर्शन घेत असतानाचा एका कुटुंबाचे फोटो 'खबर भारत' च्या हाती लागले आहेत.
हा माणूस कोन आहे माहित नाही पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आशीर्वादाने डायरेक्ट द्वारकामाईत दर्शन का?
मग कायदा आणि व्यवस्था फक्त ग्रामस्थांसाठीच असा प्रश्न उपस्थित होणारच.
(वरील फोटो कधीचे आणि कोणाचे आहे याबाबत खबर भारत कोणताही दावा करत नाही)
0 Comments: