कोल्हापूर महापालिका निवडणूक: प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी

January 03, 2021 0 Comments

महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याने सध्या विविध पक्षाचे सूत्रधार कारभारी फारच सक्रिय झाले आहेत. नेत्यांनी निवडणुकीची सूत्रे या कारभारी मंडळींच्या हातात दिल्याने या निवडणुकीत कोण कारभारी लई भारी ठरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तगडा उमेदवार शोधण्यापासून ते विविध प्रभागात तडजोडीचे गणित घालण्यापर्यंतच्या नियोजनात या कारभाऱ्यांची सध्या चांगलीच कसोटी लागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी भागाभागात नवर्षाच्या शुभेच्छा देत आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. गतवेळीप्रमाणेच यावेळी आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तशी घोषणाही केली आहे. निवडणुकीनंतर पुन्हा , राष्ट्रवादी व शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. वाचा: आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येक पक्ष सध्या प्रभागात तगडा उमेदवार शोधत आहे. हे काम नेत्यांनी कारभारी मंडळींच्यावर सोपवले आहे. काँग्रेसचे सर्व सूत्रे पालकमंत्री पाटील , आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील यांच्या हातात असली तरी त्यांना सध्या सहा कारभारी मदत करत आहेत. राष्ट्रवादीचा मुख्य भार हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. राज्याचा भार सांभाळत या निवडणुकीत पूर्ण वेळ देणे शक्य नसल्याने त्यांनीदेखील काही कारभाऱ्यांना कामाला गुंतवले आहे. आणि ताराराणी आघाडीला बहूमत मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अनेक इच्छुकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी या निवडणुकीची मुख्य सूत्रे माजी खासदार धनंजय महाडिक व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे सोपवली आहेत. त्यांच्यासह अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कारभारी मंडळीची टिम कार्यरत झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरही शिवसेनेतील धूसफूस कायम आहे. नेते चार आणि त्यांची तोंडे चार दिशेला अशी सध्या या पक्षाची अवस्था आहे. यामुळे सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याबाबत काहीच नियोजन सध्या तरी दिसत नाही. खासदार प्रा. संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे शिवसेनेची सूत्रे हलवत आहेत. सध्या तरी नेते आपल्या आपल्या सोयीच्या प्रभागात लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्र लढणार असले तरी अनेक प्रभागात छुपी युती करण्यात येणार आहे. काहीही करून भाजप व ताराराणी आघाडीला जादा जागा मिळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहे. सध्या कारभारी मंडळी याचेच नियोजन करत आहेत. त्यादृष्टीने कोणत्या प्रभागात कोणी तगडा उमेदवार द्यायचा आणि कुणी डमी उमेदवार द्यायचा याचीच सध्या चर्चा सुरू आहे. दिवसभर हे कारभारी प्रभागानुसार माहिती गोळा करत आहेत. याच माहितीवर आधारित नेत्यांची पुढे पावले पढत आहेत. वाचा: या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असली तरी खरी कसोटी लागणार आहे ती या कारभारी मंडळीची. त्यांना निवडणुकीतील यशावरच पुढील बक्षीस मिळणार आहे. यामुळे लई भारी ठरण्यासाठी या कारभारी मंडळीची धावपळ सुरू आहे. कारभारी सूत्रधार काँग्रेस... शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मोहन सालपे, सुभाष बुचडे, तौफिक मुलाणी, राजू साबळे राष्ट्रवादी... आर. के. पोवार, राजेश लाटकर, अदिल फरास, उत्तम कोराणे, विनायक फाळके भाजप, ताराराणी, जनसुराज्य आघाडी... सुहास लटोरे, प्रा. जयंत पाटील, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, सुनिल कदम शिवसेना... रविकिरण इंगवले, शिवाजी जाधव


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: