ग्रामपंचायत निकाल: 'हे' दाखले देत शिवसेनेनं भाजपला डिवचलं!

January 19, 2021 0 Comments

मुंबई: 'ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. हा कौल ठाकरे सरकारच्या बाजूनं आहे. तो मान्य करा नाहीतर राज्यातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआयला हाताशी धरून राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला हवा येऊ द्या,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. 'ठाकरे सरकार लोकांच्या मनास भिडले आहे. उद्धव ठाकरे यांचे विनम्र वागणे लोकांना भावले आहे. ग्रामपंचायत निकालांचा तोच अर्थ आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. ( over Gram Panchayat Election Results) वाचा: ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी चांगलं यश मिळवलं आहे. भाजपनं जोरदार टक्कर दिली असली तरी एकूण गोळाबेरीज पाहता महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. हे राज्यातील सरकारच्या कारभाराचं यश असल्याचा दावा शिवसेनेनं मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे. 'ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड असल्याची तोंडची हवा सोडणाऱ्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. >> ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. विखे पाटील यांच्या ताब्यात २० वर्षांपासून असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत त्यांनी गमावली आहे. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, नीतेश राणे यांच्या घरातील ग्रामपंचायती भाजपनं गमावल्या आहेत. रोहित पवार यांनी चौंडी गावची ग्रामपंचायत जिंकून आणली आहे. जगातील नंबर एकचा तोरा मिरविणाऱ्यांना महाराष्ट्रीय जनतेने माती चारली आहे. वाचा: >> विरोधकांनी गेले वर्षभर ज्या बदनामी मोहिमा राबवल्या, सरकारच्या विरोधात जहरी प्रचार केला, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन हे मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याची तोंडपाटीलकी चंद्रकांत पाटील यांनी केली होती, पण दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आहे. भाजपचा पराभव करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबाच दिला आहे. >> विरोधी पक्षाने गेल्या काही दिवसांत आपल्या अकलेचीच दिवाळखोरी जाहीर केली. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची चिंता न करता त्यांनी सुशांत राजपूत, कंगना राणावत, ईडीची वाटमारी याच विषयांवर कोळसा उगाळण्याचे कार्यक्रम केले. देशाच्या सुरक्षेची गुपिते फोडणाऱ्या अर्णब गोस्वामीला खांद्यावर उचलून नाचवले. हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याला भाजपने देशद्रोही ठरवले. हा प्रकार त्यांच्यावर उलटला आहे. >> विरोधी पक्षाला आजही एक भ्रम कायम आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार पडेल, आपणच पुन्हा अलगद सत्तेवर येऊ. त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरायला ही मंडळी तयार नाहीत. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नाही व आता ग्रामपंचायत निवडणुकीने तर भ्रमाचा फुगाच फोडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेची पावले योग्य दिशेनेच पडत आहेत. भुलभुलैयांच्या धुक्यातून ती बाहेर पडली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: