हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीची कारवाई; सहा ठिकाणी छापेमारी

January 22, 2021 0 Comments

वसईः बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांच्या विवा ग्रुपवर सक्तवसुली संचलनालय, अर्थात ईडीने (ED) सकाळी कारवाई केली आहे. कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. वसई-विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. पीएमसी घोटाळ्यात ५ ते ६ कोटींचं मनीलॉन्ड्रिंग झालं असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आले असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. वसई- विरारसह मीरा भाईंदर परिसरात ईडीने धाडी टाकल्या असून यात ईडीच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे कागदपत्रे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, अजूनही ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेयं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीनंतर पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज वर्षा राऊत यांनी परत केलं आहे होते. कोण आहेत प्रवीण राऊत? प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यानं ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील ५५ लाख पुढं वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: