भारतीय व्यापारी चीनला देणार १ लाख कोटींचा दणका

January 06, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई चीनहून येणाऱ्या वस्तूंची आयात २०२१ या संपूर्ण कॅलेंडर वर्षात १ लाख कोटी रुपयांनी कमी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या () मुंबई महानगर प्रदेशाच्या नववर्ष बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. 'कॅट' ही देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वांत मोठी संघटना आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या देशभरातील ५ कोटी व्यापाऱ्यांनी २०२० हे वर्ष 'व्यापारी आत्मसन्मान' म्हणून साजरे केले. याअंतर्गत चिनी मालाचा बहिष्कार करणे व अधिकाधिक भारतीय वस्तू विक्रीचा प्रयत्न करण्यात आला. हीच मोहीम मुंबई महानगर प्रदेशात पुढे नेण्याचा निर्णय अलिकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 'कॅट' मुंबई महानगरचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईतील ग्राहक मागणी ही देशात सर्वाधिक आहे. अशावेळेस व्यापाऱ्यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यास मुंबईत त्याचा सर्वांत मोठा परिणाम होईल. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईतील सर्वच व्यापारी यासाठी सज्ज असून तशी रणनीती या वर्षभरात आखली जाईल.' २०२० हे वर्ष करोना संकटात गेल्याने वर्षभर व्यापार शांत होता. पण नवरात्र-दिवाळीदरम्यान दमदार उलाढाल झाली. त्यावेळी 'कॅट'च्या सदस्यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकल्याने तेथील ४० हजार कोटी रुपयांच्या आयातीला फटका बसला. मुंबईत हा आकडा साडेपाच हजार कोटी रुपयांचा होता. आता २०२१ मध्ये १ लाख कोटी रुपयांची आयात कमी करण्याच्या निर्धारात मुंबईतील किमान २५ हजार कोटी रुपयांच्या चिनी वस्तूंची विक्री बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. यात तीन लाखांहून अधिक व्यापारी सहभागी होतील, असे ठक्कर यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: