राष्ट्रवादी आणि भाजपच्या अभियानांमुळं मतदारांमध्ये 'ही' चर्चा

January 28, 2021 0 Comments

अहमदनगर: सरकार टिकणार की जाणार, मध्यावधी निवडणुका होणार की केवळ सत्ता बदलणार अशा चर्चा सुरू असतानाच आणि भारतीय जनता पक्षाने थेट मतदार संपर्काचे अभियान हाती घेतले आहे. राष्ट्रवादीने सुरू केला आहे, तर भाजपतर्फे सुरू होत आहे. राष्ट्रवादीच्या अभियानातून पदाधिकारी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत, तर भाजपची मतदारांच्या घरोघर पोहचण्याची योजना आहे. राष्ट्रवादीचे अभियान सुरू झाले असून भाजपचे ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. अलीकडे निवडणुका जवळ आल्यावर राजकीय पक्ष असे अभियान राबवित असल्याने त्यादृष्टीने चर्चा सुरू झाली आहे. पक्षवाढीसाठी या दोन पक्षांची धडपड सुरू असली तरी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात मात्र याबाबतीत शांतताच आहे. वाचा: महाराष्ट्र प्रदेश भाजपने ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या काळात बूथ संपर्क महाअभियान सुरू केले आहे. याचे नियोजन करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. राजेंद्र फडके नगरला आले होते. कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी याची माहिती देताना सांगितले, ‘प्रदेश भाजपतर्फे हे अभियान सुरू करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सध्या याची पूर्व तयारी सुरू आहे. मेरा बूथ सबसे मजबूत, बूथ जितेंगे, तो देश जितेंगे, अशी घोषवाक्य घेऊन हे अभियान राबविण्यात येत आहे. या काळात बूथ प्रमुख कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. केंद्र सरकारच्या योजना, राज्यातील भाजपच्या सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या योजना यांची माहिती मतदारांना देऊन संवाद साधण्यात येणार आहे. बूथ प्रमुखानंतर पेज प्रमुख ही योजना आहे. यामध्ये मतदारयादीच्या एका एका पानावर असलेल्या मतदारांची जबाबदारी त्या भागातील कार्यकर्त्यांवर देण्यात येणार आहेत. हे कार्यकर्ते त्यानुसार घरोघरी जाऊन पक्षाचे काम पोहचविणार आहेत. ११ फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ यांचा स्मृतीदिवस आहे. हा दिवस भाजपतर्फे समर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना पक्षासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’ अशा पद्धतीने भाजपचे अभियान सुरू होत आहे. वाचा: याच पद्धतीचे राष्ट्रवादीचे परिवार संवाद अभियान सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे. गुरुवारपासून गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथून पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १८ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या १८ दिवसांमध्ये विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. दौऱ्याचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात दौरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद हा त्या भागातील पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणे, त्यांना पक्ष संघटना वाढविण्यासाठी येणारी वेगवेगळी आव्हाने या गोष्टींचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीने पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. आघाडीतील शिवसेना हा पक्ष सरकार आणि आघाडी सांभाळ्यात तर काँग्रेस पक्ष सत्तेतील वाट्यासाठी संघर्ष आणि पक्षांतर्गत गोष्टींमध्येच अडकला असल्याचे दिसून येते. भाजप आणि राष्ट्रीवादी या दोन्ही पक्षांची या आघाडीवरील सक्रियता मात्र निवडणुकीच्या दृष्टीने वेगळे संकेत देणारी मानली जात आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: