'राज्यपालांबद्दल काही वक्तव्य करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही'

January 26, 2021 0 Comments

पुणे: 'राज्यपाल ही राज्यातील प्रथम क्रमांकाची व्यक्ती असते. त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. जे काही झालं ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्या बातम्याही आलेल्या आहेत,' असा चिमटा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज राज्यपालांना काढला. वाचा: दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी काल मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त मोर्चा काढला होता. महाविकास आघाडीतील पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला होता. मोर्चानंतर शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार होते. मात्र, राज्यपालांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी निवेदन फाडून फेकून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी राज्यपालांच्या या भूमिकेवर जळजळीत टीका केली होती. 'राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण आमच्या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. असा राज्यपाल याआधी महाराष्ट्रानं पाहिला नाही,' असा संताप शरद पवार यांनी आझाद मैदानात बोलताना व्यक्त केला होता. शेतकरी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत विचारलं असता त्यांनी अत्यंत संयमी आणि सावध प्रतिक्रिया दिली. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. 'बऱ्याच दिवसांपूर्वी शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधींनी राज्यपालांना या मोर्चा संदर्भात माहिती दिली होती व भेटीची मागणी केली होती. ही गोष्ट माझ्याही वाचनात आली होती. काही सहकाऱ्यांनीही मला तसं सांगितलं होतं. मात्र, २५ जानेवारी रोजी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं राज्यपाल भेटू शकणार नाहीत, असं राजभवनकडून कळवण्यात आलं होतं असंही आता बोललं जातंय. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, तेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम बदलता येऊ शकतो. कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. राज्यपाल ही राज्यातील प्रथम क्रमांकाची व्यक्ती असते, त्यांच्याबद्दल मी काही बोलणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही,' असं अजित पवार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: