कुणी रक्ताचं असलं तरी त्याला शिक्षा ही होईलच!; प्रशांत गडाख यांचा आक्रोश

January 01, 2021 0 Comments

नगर: ज्येष्ठ नेते, साहित्यिक यांची सून यांनी आत्महत्या केल्यानंतर तब्बल पावणेदोन महिन्यांनी त्यांचे पती, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी काही संकेतही दिले आहेत. ‘ज्या कारणाने तू हा निर्णय घेतला असेल, त्याला शिक्षा नक्की मिळेल, अगदी कुणी रक्ताच्या नात्याचे असले तरी,’ असे प्रशांत यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. याशिवाय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. ( Latest News ) वाचा: सुसंस्कृत राजकीय घराणे म्हणून ओळखले जाते. त्यांचे राजकारणात सक्रीय असलेले चिरंजीव राज्याचे जलसंधारण मंत्री आहेत. तर प्रशांत सामाजिक कार्यात आणि विजय व्यवयासात आहेत. ७ नोव्हेंबर रोजी प्रशांत यांच्या पत्नी गौरी घरात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. पोलीस तपासात त्यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या प्रकरणावर गडाख कुटुंबीयांकडून काहाही जाहीर भाष्य झालेले नव्हते. वाचा: आज गौरी यांचे पती प्रशांत यांनी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. पत्नीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी काही संकेतही दिले आहेत. या काळात सहवेदना व्यक्त केलेल्यांना आणि आपल्या पत्नीला उद्देशून केलेल्या या पोस्टमध्ये प्रशांत यांनी म्हटले आहे. ‘माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते. परंतु माझी मनस्थिती तेव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती. त्याबद्दल सॉरी. माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल. नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे ते मला घेऊनच चालावं लागेल. 'वर्तमान जगायचंय मला' ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती ती अशा रितीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खूप आले पण मी कधीही डगमगलो नाही. उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो... पण... गौरी तू मला हरवलं... माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे. आता कुणाशी लढू... तू माझी पत्नी नव्हती तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होती असं तूच मला म्हणायचीस ना... तशीही तू मुडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीसं... तू चेष्टेत मला म्हणायची की, 'तुमच्याआधी मीच जाणार' पण तू अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली. साहेबांची सगळ्यात आवडती सून नाही तर तू मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी... आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी... माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे, पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे. ज्या कारणाने तू हा निर्णय घेतला असेल, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे. गौरी, मी घरी नव्हतो, तू निष्प्राण...आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतून.. गौरी, तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे.. मी आता खरंच फकीर झालोय पण मला माझ्यासमोर माझ्या मुली, माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात. मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरू शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल. मी स्वतःहून ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं की नाही. पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात.’ वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: