'असे येडे बरळत असतात'; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर राऊतांची टीका

January 28, 2021 0 Comments

मुंबईः मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेनेचे खासदार यांनी जहरी टीका केली आहे. असे येडे बरळत असतात, कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांतील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहीजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला आहे. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांतील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. कायद्याने काय व्हायचे ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटक सरकारने आता विसरु नये. कोणी तिकडे काही बरळलं तरी आम्हाला फर पडत नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबई महाराष्ट्रात जे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कोणतीही सक्ती केलेली नाही. त्यांना इथं संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो, कानडी शाळांना अनुदान देतो, कानडी संस्थादेखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे?, असा सवाल करतानाच त्यांनी ही लढाई आपली भाषा संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कोणाला सांगितलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे. शेतकरी आंदोलनावरुन भाजपवर टीका शेतकरी आंदोलनातील हिंसाचारावरही राऊतांनी निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने दडपशाही सुरु केल्यावर लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले. ते कोण होते? त्यांना कोणाची फूस होती? याचा शोध घेतला पाहिजे. भाजपच्या नेतृत्वातील गट या आंदोलनात घुसला होता. त्यामुळं आंदोलनात फूट पडल्याचं आज चित्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: