मुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच; 'या' नेत्याचा दावा

January 26, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई आगामी निवडणुकीत २०२२मध्ये मुंबईत काँग्रेसचाच महापौर असेल, याचा पुनरुच्चार मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आमदार यांनी केला. मुंबईत काँग्रेसशिवाय अन्य कुठल्याही पक्षाचा महापौर होणे अशक्य असल्याचा दावाही जगताप यांनी यावेळी बोलताना केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये मला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड ऊर्जा दिसत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकद आहे. या कार्यकर्त्यांनी वर्षभरात महापालिका निवडणुकांसाठी आपली अशीच ताकद लावली तर २०२२मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर मुंबईमध्ये काँग्रेसचाच महापौर असेल, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. ईशान्य मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. चरणजितसिंग सप्रा, अ. भा. काँग्रेस सचिव सोनल पटेल, जेनेट डिसुझा, वीरेंद्र बक्षी, डॉ. अजंता यादव, संदेश कोंडविलकर, प्रणिल नायर, सर्व स्थानिक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. वाचा: मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये निवडणूक लढताना काँग्रेस उमेदवार हा स्थानिक कार्यकर्त्यांमधीलच एक असेल. कोणी कितीही सांगितले, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी वॉर्डमध्ये बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे भाई जगताप म्हणाले. तसेच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात पूर्णपणे माफी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेसच्या २९ नगरसेवकांसोबत मुंबईकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे. नुसते निवेदन देऊन गप्प बसणार नाही, तर त्यावर कृती करायला त्यांना भाग पाडणार असा दावा त्यांनी केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: