रोहित पवारांना 'नकली' म्हणत निलेश राणेंची टीका; दिला 'हा' पुरावा

January 25, 2021 0 Comments

मुंबईः केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्दे करावे, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील सहभागी झाले आहेत. तसंच, आझाद मैदानात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत. या प्रकरणावर भाजप नेते यांनी रोहित पवारांचं उदाहरण देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे आमदार हे सातत्याने सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबतही त्यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचाच आधार घेत निलेश राणे यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे. 'नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत,' असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. त्याचबरोबर, रोहित पवारांच्या कंपनीच्या पोस्टरचा एक फोटोही शेअर केला आहे. पोस्टरमध्ये काय लिहलंय? करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे वर्षभर हमी भावाने खरेदी शेतकऱ्याला क्रेडीटवर बेबीकॉर्न बियाणे व मिरची रोपे याचा पुरवठा शुन्य टक्के वाहतूक विविध पिकांसाठी तज्ञांद्वारे प्लॉट व्हिजीट व मार्गदर्शन


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: