अरे बापरे! मला आता त्यांची भीती वाटतेय: संजय राऊत

January 02, 2021 0 Comments

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातील अग्रलेखातून करण्यात येणाऱ्या टीका-टिप्पणीवर अलीकडेच्या काळात भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनातील भाषेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाराज झाले असून ते सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. यांच्या या निर्णयावर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. सामनाच्या अग्रलेखात वाईट भाषा वापरण्यात आली होती. त्याबद्दल मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. रश्मी वहिनी संपादक असलेल्या वृत्तपत्राचं असं संपादकीय असू शकत नाही, अशी भूमिका पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'अरे बापरे, मला आता त्यांची भीती वाटतेय. ते पत्र लिहतायेत,' असं मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, 'सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सामना वाचत राहिले तर त्यांचा विश्वास बसेल की पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,' अशी टीका राऊतांनी केली आहे. 'औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्याला तीस वर्ष झाली आहेत. आता फक्त कागदावर बदलायचं आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले, तर मुद्दा निकाली निघेल,' असंही राऊतांनी स्पष्ट केला आहे. 'महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे आणि असायलाच हवी.जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसाच औरंगजेबही नाही,' असं राऊत म्हणाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: