औरंगाबाद नामांतर: रोहित पवारांनी मांडली वेगळी भूमिका
सोलापूर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पातळीवर शहराच्या नामांतराचा प्रश्न गाजतो आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही पक्ष या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत. तर, भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार यांनी प्रथमच या मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. (What said on Renaming ) वाचा: सोलापूर येथे वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं. 'औरंगाबादचं '' करण्याची शिवसेनेची मागणी आहे. इतर काही जणांचीही तशी मागणी आहे. याबाबत मी आधीही माझं मत मांडलंय. कुठल्याही गावाचं किंवा शहराचं नाव बदलायचं असेल तर त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेता आलं पाहिजे. त्यांचं मत समजून घेतल्यानंतर जो काही निष्कर्ष येईल, त्यानुसार त्यांच्या मताला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असते,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. वाचा: 'तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मला रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. त्याकडंही लक्ष देणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमांवर आधारित आहे. त्यामुळं अनेक प्रश्नांवर काम करायचं आहे,' असंही रोहित यांनी सांगितलं. 'लॉकडाऊन काळात लोकांना आलेल्या वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष वापराइतकेच बिल आकारण्याबाबत विचार व्हायला हवा, असं मत त्यांनी मांडलं. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: