गोरेवाडा नामकरण: बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही, पण...
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीतील बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबत पक्षाने कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, राजे बक्त बुलंद शहा यांच्या शहरातील उद्यानाला गोंडवाना नाव देण्यावर पक्ष ठाम असल्याचे समजते. वाचा: शिवसेनाप्रमुख यांचे नाव देताच आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, 'ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही पण, गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झालेला आहे', असे स्पष्ट केले. माजी महापौर माया इवनाते यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी मोर्चा व अन्य संघटनांनी नाव बदलण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. नामकरणाच्या वादावरून तापलेल्या राजकीय वातावरणात बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी होणार आहे. या नामकरणावर काँग्रेसचे काही नेते खूश नसल्याची चर्चा आहे. पण, याबाबत कुणीही उघडपणे बोललेले नाही. वाचा: गोरेवाडा येथे सिंगापूरहून चांगले प्राणिसंग्रहालय करण्याची मूळ योजना होती. तब्बल दोन दशकांपासून या प्रकल्पाची चर्चा चालली आहे. पहिल्या युतीच्या काळात तत्कालीन वन राज्यमंत्री विनोद गुडधे यांनी हा प्रकल्प जाहीर केला व विदर्भ वैधानिक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अरुण अडसड यांच्याकडून दहा लाख रुपये खेचून आणले. निधी परत जाऊ नये, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला देण्यात आले. यानंतर पश्चिम नागपूरचे प्रतिनिधित्व करताना देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला, हे विशेष. नागपूर त्रिशताब्दीदरम्यान या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न झाले. आघाडीच्या काळातील वनमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, पण विशेष प्रगती झाली नाही. फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्पाला गती आली. निवडणुकीपूर्वी उद्घाटनाची तयारी करण्यात आली होती. मात्र, मुहूर्त निघाला नाही. सामाजिक समीकरण व शहरातील राजकीय स्थिती लक्षात घेऊन गोंडवाना नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भाजपचे स्थानिक आमदार वा अन्य लोकप्रतिनिधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे समजते. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: