पवारांच्या नगर दौऱ्यात मनसे झळकवणार 'हे' बॅनर; टेन्शन वाढले!

January 21, 2021 0 Comments

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे २४ जानेवारीला एका खासगी हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यासाठी नगरला येणार आहेत. संबंधित हॉस्पिटलने तसे जाहीर करतानाच या कार्यक्रमाच्या पत्रिकाही वाटल्या आहेत. मात्र, शरद पवार यांच्या या दौऱ्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'पवार साहेब खासगी हॉस्पिटलने लूटमार केलेल्या वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळवून द्या' अशा आशयाचे बॅनर शरद पवार ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गावर लावण्याचा निर्णय घेत तसे नियोजन सुरू केले आहे. मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे यांनी ही माहिती दिली. वाचा: करोना काळातील जे खासगी हॉस्पिटलमधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्यासाठी मनसेने निवेदन दिली, आंदोलन केली. तसेच उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने करोना काळातील संपूर्ण बिलांची तपासणी करून आतापर्यंत १४ ते १५ खासगी हाॅस्पिटलकडून जवळपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महापालिकला दिले आहेत. हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावे, असे आदेश महापालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटलला दिले. परंतु या सर्व हॉस्पिटलने या आदेशाला केराची टोपली दाखवली, असा आरोपही भुतारे यांनी केला आहे. आजपर्यंत महापालिकेने सुद्धा वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित हॉस्पिटलवर केली नाही. करोना आजारात गोरगरीब जनतेला सरकारी रुग्णालयात बेड मिळत नव्हते, म्हणून त्यांना नाईलाजस्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले व त्यांच्याकडून लाखो रुपयांचे बिले या खासगी हाॅस्पिटलवाल्यांनी वसूल केली असा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारने दिलेल्या कुठल्याही नियमाप्रमाणे या हॉस्पिटलवाल्यांनी बिले दिली नसल्यामुळे गोरगरीब जनतेची लूटमार झाली. त्यामुळे आम्ही मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पालकमंत्री यांना निवेदन पाठविले. परंतु कुणीही या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. रविवारी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार नगरला येत आहेत. या दौऱ्यावेळी खासगी हाॅस्पिटलचा वाढीव बिलांचा प्रश्न मांडण्यासाठी पवार येणार आहेत त्या मार्गावर ''पवार साहेब गोरगरीब जनतेची करोना आजारवरील वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून द्या'' असे बॅनर लावणार आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या सूचनेनुसार हे बॅनर लावण्यात येणार असून पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला उपजिल्हाध्यक्ष अॅड अनिता दिघे, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष व कार्यकर्ते नियोजन करणार आहेत. तसेच मनसेचे शिष्टमंडळ पवार यांना भेटून या संदर्भात निवेदन सुद्धा देणार आहे, असेही भुतारे यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: